मध्यप्रदेशच्या रतलाममधील महालक्ष्मी देवीचे मंदिर सजले करोड रुपयांनी

mahalaxami
करोडो रुपयांच्या नोटांचा ढीग धनासाठी ओळखल्या जाणाऱ्या देवीच्या मंदिरात जमा झाला असून मौल्यवान दागिने आणि लाखोच्या नोटांनी मध्यप्रदेशमधील रतलामचे प्रसिद्ध महालक्ष्मीचे मंदिर सजले आहे. दिवाळीच्या आधी धनोत्रयोदशीला माणकचौक येथील महालक्ष्मीच्या मंदिरात भक्तांकडून दागिने आणि पैशांपासून सजवण्याची प्रथा आजही कायम आहे. २ हजारांपेक्षा जास्त भक्तांनी आत्तापर्यंत या मंदिरात दागिने आणि रोख दान केले आहे.
mahalaxami1
देवीचा शृंगार महालक्ष्मी मंदिरात दान केलेल्या दागिन्यांनी केला जातो. त्याचबरोबर जमा झालेल्या नोटांनी मंदिराचा गाभारा आणि आजूबाजूचा परिसर सजवला जातो. ज्यामध्ये १० रुपयांपासून ते २ हजार रुपयांपर्यंतच्या नोटांनी मंदिर सजवले जाते. मिळालेल्या महितीनुसार धनत्रयोदशीच्या दिवशी १०० कोटींच्या रोख रुपयांनी मंदिर सजवण्यात आले आहे.
mahalaxami2
वर्षानुवर्ष रतलामच्या महालक्ष्मी मंदिरात दागिने आणि रोख रुपये देण्याची प्रथा आहे. एका रजिस्टरमध्ये दिलेल्या भेटवस्तूची नोंद केली जाते. ज्यामध्ये दिवाळीच्या दिवशी नोंद केल्यानुसार भक्तांना प्रसादाच्या स्वरुपात परत दिले जाते. वर्षभरात आलेले संपूर्ण दान भक्तांना प्रसादाच्या स्वरूपात याच दिवशी वाटण्यात येते. महालक्ष्मी मंदितील प्रथेमुळे लोकांच्या घरामध्ये लक्ष्मीचा आशिर्वाद कायम राहतो असा त्यांचा समज आहे. याच कारणाने ही परंपरा आजपर्यंत सुरू आहे.