‘शास्त्री बुवां’चा बोनस न मिळाल्याने रेल्वेतून प्रवास!

ravi-shastri
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दिवाळी बोनस न दिल्यामुळे रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करत आहेत, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. यामागचे कारण लोकलमधील डुप्लिकेट रवी शास्त्रींच्या व्हिडिओमुळे ते सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत.

मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये रवी शास्त्री यांच्यासारखी दिसणारा एक व्यक्ती प्रवास करत होता. सोशल मीडियावर संबंधित छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर रवी शास्त्री यांना नेटिझन्सनी ट्रोल केले आहे. संबंधित व्यक्तीचा व रवी शास्त्री यांचा चेहरा मिळता जुळता आहे. रवी शास्त्रींना यापूर्वी वाढलेल्या पोटामुळे ट्रोल करण्यात आले होते. आता ते त्यांच्या डुप्लिकेट चेहऱ्यामुळे पुन्हा चर्चेत आहेत.


नेटीझन्स रवी शास्त्री यांचे डुप्लिकेटचा छायाचित्र शेअर करताना म्हणतात, बीसीसीआयने दिवाळी बोनस न दिल्यामुळे जनरल डब्ब्यात रवी शास्त्री प्रवास करत आहेत. टीममध्ये विराट कोहली नसताना रवी शास्त्रींची झालेली अवस्था. विराट कोहलीने रवी शास्त्रींना पार्टीचे आमंत्रण न दिल्याने ते नाराज आहेत. रवी शास्त्रींची अवस्था २०१९ क्रिकेट विश्वचषकानंतर अशी होईल. अशा प्रकारच्या विविध प्रतिक्रिया सोशल मीडियावर पहायला मिळतात.