राखी सावंत तर ट्रांसजेंडर; तनुश्रीचा राखीवर पलटवार

tanushree-dutta
दिवसेंदिवस राखी सावंत आणि तनुश्री दत्ता यांच्यातील वाद नवे वळण घेत आहे. या दोघींचीही नावे बऱ्याच काळापासून चर्चेत आहेत. राखीने #MeToo मोहिमेतून तनुश्रीवर बलात्काराचे आरोप लावत ती ‘लेस्बियन’ असल्याचे सांगितले होते, तर तनुश्रीनेही आता राखीवर पलटवार करत ती ट्रांसजेंडर असल्याचे म्हटले आहे.

राखीने काही दिवसांपूर्वीच पत्रकार परिषद घेऊन तनुश्रीवर घणाघाती आरोप केले होते. तिचे हे सर्व आरोप तनुश्रीने नाकारले आहेत. एका माध्यमाशी अलिकडेच बोलताना तनुश्री म्हणाली की, राखीचे सर्व आरोप खोटे असून ती फक्त अफवा पसरवत आहे. खरे सांगायचे तर ती एक ट्रांसजेंडर आहे. सिनेसृष्टीतील बऱ्याच लोकांना याबाबत माहिती असल्याचेही ती म्हणाली.

ती पुढे म्हणाली, वैयक्तिक स्तरावर राखीने सांगितले होते की ती कास्टिंग काउचमध्ये सहभागी होती. तिचे विचार एवढे खालावले आहेत, की तिला सत्य आणि असत्य गोष्टीतील फरक समजत नाही. तिचा आत्मा मरण पावला आहे. आभास आणि गंभीरता यातील फरकही तिला जाणवत नाही. जे काही राखी बोलते ते आत्मविश्वासाने बोलते. तिने माझ्याविरोधात जे पुरावे गोळा केले आहेत त्याने ती स्वत:चे नुकसान करुन घेत आहे. माझ्याबाबतीत ती काय बोलते, मला काहीही फरक पडत नसल्याचेही तनुश्री म्हणाली.