‘सारेगामापा’मधील ‘छोटे भगवान’ने गायले ‘नाळ’ मधील ‘जाऊ दे न वं’ गाणे

jayesh-kumar
सध्याच्या घडीला प्रेक्षकांमध्ये नागराज मंजूळे दिग्दर्शित ‘नाळ’ चित्रपटातील ‘जाऊ दे न वं’ या गाण्याची प्रचंड क्रेझ पाहायला मिळाली. हे गाणे सोशल मीडियावरही टॉप ट्रेण्डिंग बनले होते. चाहत्यांच्या बालपणीच्या आठवणी ‘नाळ’च्या टीझरमधील बालकलाकाराने जाग्या करून दिल्या. पण कोणी हे गाणे गायले आहे याबद्दलही चाहत्यामध्ये उत्सुकता होती. तर हे गाणे सारेगामापामधील छोटे भगवान म्हणजेच जयेश कुमार याने गायले आहे.

‘सारेगामापा- लिटील मास्टर’ मध्ये जयेश कुमार हा छोटे भगवान या नावाने लोकप्रिय झाला होता. सेटवर तर त्याच्या भरपूर बाललीला प्रेक्षकांनी पाहिल्या, पण त्याने ‘नाळ’मधील मराठमोळे ‘जाऊ दे न वं’ हे गाणे गातानाही भरपूर धमाल केली. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. जयेश या व्हिडिओत कशाप्रकारे हे गाणे गात आहे हे दाखविण्यात आले आहे. सारेगामापा मध्ये असताना जयेशने प्रचंड लोकप्रियता मिळविली होती. अनेक मोठ्या मोठ्या गायकांनाही त्याने त्याच्या आवाजाने भूरळ पाडली होती. ‘नाळ’मधील चैत्याचे भावविश्वदेखील त्याने तंतोतत या गाण्याद्वारे उलगडले आहे.