‘अवनी’ला गोळ्या घालायला मुनगंटीवार काय स्वत: गेले नव्हते – मुख्यमंत्री

devendra-fadanvis
उस्मानाबाद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवनी वाघीण मृत्यू प्रकरणात सुधीर मुनगंटीवार यांचा राजीनामा मागणे चुकीचे असून ते स्वतः बंदूक घेऊन वाघिणीला मारायला गेले नसल्याचे म्हणत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची पाठराखण केली आहे.

राज्य सरकारच्या आदेशानंतर अवनी वाघिणीला गोळ्या घालून ठार केल्यावर मोठे वादंग तयार झाले. आता मुख्यमंत्र्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. याप्रकरणी आपण मनेका गांधी यांच्याशी बोलणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडे सात हजार कोटींची मदत मागितली आहे, अशी माहिती दिली आहे. जी मदत केंद्राकडे मागायची आहे त्याचा आराखडा जवळपास पूर्ण झाला आहे. कृष्णा-मराठवाडा प्रकल्पासाठीही नाबार्डकडे २२०० कोटी मागितले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

Leave a Comment