तुमच्या काळजाचा थरकाप उडवेल ‘अमावस’चा टिझर

amavas
दिग्दर्शक भूषण पटेल यांना रहस्यमय चित्रपटांचे दिग्दर्शक म्हणून ओळखले जाते. ते आता प्रेक्षकांच्या काळजाचा थरकाप उडवणारा ‘अमावस’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. नुकताच या चित्रपटाचा पहिला टिझर रिलीज करण्यात आला आहे.

‘१२० एव्हिल रिटर्नस’, ‘रागीणी एमएमएस २’ आणि ‘अलोन’ या चित्रपटाचे भूषण पटेल यांनी दिग्दर्शन केले होते. त्यांची शैली प्रेक्षकांना आवडली होती. ते आता आगामी ‘अमावस’मध्ये हाच जॉनर हाताळणार आहेत.


काही दिवसापूर्वीच ‘अमावस’ चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले होते. यापाठोपाठ आलेला हा टिझर चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवणारा आहे. सचिन जोशी, विवान भथेना आणि नर्गिस फाक्री यांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. १४ डिसेंबर २०१८ रोजी ‘अमावस’ हा चित्रपट रिलीज होणार आहे.