जगाला चकित करणारी टेस्ला कंपनी पुढील वर्षी भारतात येणार – इलॉन मस्क

teska
वॉशिंग्टन- पुढील वर्षी भारतात स्वंयचलित ऑटोमोबाईल टेक्नॉलीजीने जगाला चकित करणारी टेस्ला कंपनी येणार असल्याचे ट्विट टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांनी केली आहे.

ट्विटमध्ये मस्क यांनी म्हटले आहे की, टेस्ला कंपनी पुढील वर्षी भारत, आफ्रिका आणि दक्षिण आफ्रिकेत अंशत: अस्तित्व तयार करणार आहे. त्यानंतर कंपनी २०२० ला विस्तार करणार आहे. उत्तर अमेरिका, युरोप आणि चीनशिवाय इतर देशांच्या बाजारपेठेत कंपनी ही विस्तार करणार आहे.

ट्विटमध्ये मस्कने म्हटले आहे, की लोकसंख्या असलेल्या देशात त्यांची सर्व्हिस टीम ही विस्तार करणार आहे. यामध्ये उत्तर अमेरिका, पूर्व युरोप, चीन आणि जपानमध्ये पुढील विस्तार करणार आहे. टेस्ला आणि पॅनासॉनिक या दोन्ही कंपन्या ईलेक्ट्रीक वाहनांसाठी लागणाऱ्या बॅटऱ्या सर्वात अधिक तयार करतात. ट्विटर वापरकर्त्याने याबाबात विचारले असते इलॉनने सांगितले की, टेस्ला कंपनी स्थानिक पातळीवर विविध कंपन्यांकडून बॅटऱ्या तयार करणार आहे. स्वयंचलित वाहनांची कंपनी म्हणून टेस्ला ही जगभरात प्रसिद्ध आहे. इलेक्ट्रिक कारची टेस्ला कंपनीने निर्मिती केली आहे.

Leave a Comment