पंतजलीची संस्कारी जीन्स, लंगोट बाजारात

patranajli
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत आज धनोत्रयोदशीच्या मूहूर्तावर योग गुरू बाबा रामदेव आज पंतजलीच्या पोशाखांचे स्टोअर सूरू करणार आहेत. पंतजलीच्या निरनिराळ्या परिधानांची बाजारात एन्ट्री होणार आहे.

‘पतंजली परिधान’ या नावाने दिल्लीच्या नेताजी सुभाष प्लेस या ठिकाणी तयार कपड्यांचे मोठे स्टोअर सूरू केले जाणार आहे. ‘पतंजली परिधाना’त पुरुष, स्त्रिया आणि लहान मुलांसाठी पोशाखांचे अनेक पर्याय उपलब्ध असणार आहेत. पतंजली परिधानात असलेले कपडे लाईव्हफीट, आस्था आणि संस्कार या ब्रॅंड नावाने उपलब्ध असणार आहेत. यात डेनिम, जीन्सपासून ते पारंपारिक पोशाख ग्राहकांसाठी असणार आहेत. ३००० वेगवेगळी उत्पादने पतंजली परिधान बाजारात आणणार आहे. पतंजली परिधानात आधुनिक ते पारंपारिक सर्व प्रकारचे कपडे उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

यातून परदेशी कंपन्यांची मक्तेदारी मोडीत काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. खादीद्वारे ज्याप्रमाणे स्वातंत्र्यलढा पुढे नेण्यात आला त्याप्रमाणेच ‘पतंजली परिधान’द्वारे देशाला आर्थिक स्वातंत्र्य मिळवून दिले जाणार आहे, असे मत बाबा रामदेव यांनी व्यक्त केले आहे.

Leave a Comment