मेक्सिकोमध्ये साजरा केला जातो ‘मृत्यूचा दिवस’

mexico
मेक्सिको – मागील शुक्रवारी मेक्सिको सिटीमध्ये मृत्यूचा सण साजरा करण्यात आला. फुले आणि मेणबत्ती घेऊन शहरातील स्मशानभूमीमध्ये मेटपेक शहरातील लोक एकत्र जमले होते. त्यानंतर आपल्या मृत प्रियजनांच्या कबरेजवळ जाऊन त्यांनी फुले आणि मेणबत्ती ठेवल्या.

हा मृत्यूचा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या २ दिवसांमध्ये हा सण साजरा केला जातो. सर्व लोक या दिवशी त्यांच्या मृत पावलेल्या प्रियजनांच्या, नातेवाईकांना दफन केलेल्या जागेजवळ जाऊन थांबतात. रात्रभर तेथे थांबून प्रार्थना केली जाते, गाणी व संगीताचे कार्यक्रम करतात. जमलेले लोक यावेळी त्या कबरींवर फुले व मेणबत्तींची आकर्षक सजावट करतात. मृत व्यक्तींची आवडती गाणी गातात.

Leave a Comment