वास मारणारे मोजे विकून ही मुलगी कमावते लाखो रुपये

socks
कोण कुठला व्यवसाय करून किती पैसे कमावेल हे जसे सांगता येत नाही तसेच लोक कोणत्या गोष्टीसाठी किती पैसे खर्च करतील हेही सांगता येणार नाही. अमेरिकेतील एक मुलगी स्वतःचे वापरलेले घाणेरडे मोजे आणि बूट विकून लाखो रुपयांची कमाई करते आहे. विशेष म्हणजे त्यासाठी तिला ऑफिस, दुकान या कशाचीही गरज लागलेली नाही. ती मोजे आणि बूट याचे फोटो सोशल मिडीयावर शेअर करून हि कमाई घरबसल्या करते आहे.

रोक्सी साईक्स असे या हुशार मुलीचे नाव आहे. तिचे पाय खूपच सुंदर आणि आकर्षक आहेत असे नेहमी मित्रमंडळी कौतुक करत असत. मग तिने फक्त पायांचे फोटो सोशल साईटवर टाकले आणि त्यातून तिला वर्षात १ लाख पौंड म्हणजे ७३ लाखांची कमाई झाली. मग हाच व्यवसाय अधिक विस्तारित करण्याची हुशारी तिने दाखविली. सुंदर पायांची मालकीण कोण याची उत्सुकता लोकांना होतीच. रोक्सीने प्रथम सोशल मिडीयावर तिचे फॉलोअर्स वाढविले आणि मग तिने वापरलेलं मोजे आणि बूट यांचे फोटो शेअर केले. पहिल्याच महिन्यात त्यातून तिला २ हजार पौंडची कमाई झाली. आता ती या व्यवसायाबरोबर अनेक मॉडेल्सना पायांच्या मदतीने कमाई कशी करता येते याचे प्रशिक्षणही देते असे समजते.