मोदी सरकार धनत्रयोदशीच्या दिवशी देणार स्वस्तात सोन

gold
मुंबई : सोने धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करणे शुभ मानले जाते. पण लोक सोन्याचे भाव खूपच जास्त झाल्याने ते खरेदी नाही करु शकत नसल्यामुळे मोदी सरकारने एक नवी योजना आणली आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी स्वर्ण बाँड योजनेची सुरुवात मोदी सरकार करणार आहे.

याबाबत माहिती देताना अर्थ मंत्रालयांच्या एका अधिकाऱ्याने म्हटले की, ही योजना ५ ते ९ नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. यासाठी ३१८३ रुपये प्रति ग्रॅमच्या दराने सोने खरेदी करता येणार आहे. ऑनलाइन किंवा डिजिटल माध्यमातून ५० रुपये प्रति ग्रॅममागे सूट मिळणार आहे. यासाठी स्वर्ण बाँडचे मूल्य ३,१३३ रुपए प्रति ग्रॅम असेल.

नोव्हेंबर २०१५मध्ये सरकारने सॉवरेन स्वर्ण बाँड योजना सुरु केली होती. योजनेच्या अंतर्गत कमीत कमी एक ग्रॅम सोन्यासाठी बाँड खरेदी केला जाऊ शकतो. प्रत्येक वर्षी ५०० ग्रॅम सोने खरेदी करण्याची मर्यादा आहे. यामागचा उद्देश सोन्याची भौतिक मागणी कमी करण्याचा आहे. या योजनेमुळे बाँडला सोन्याच्या प्रति ग्रॅम प्रमाणे मोजले जाते. आरबीआयच्या सूचनेनुसार सरकारी स्वर्ण बाँड ऑक्टोबर २०१८ ते फेब्रुवारी २०१९ दरम्यान प्रत्येक महिन्याला जारी केले जातील.

या बाँडची विक्री बँक, स्‍टॉक होल्डिंग्‍स कॉरपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एसएचसीआयएल), पोस्ट ऑफीस आणि नॅशनल स्‍टॉक एक्‍सचेंज आणि बीएसईच्या माध्यमातून होणार आहे. या योजनेमुध्ये ९ नोव्हेंबर दरम्यान खरेदी केले जाणारे बाँड १३ नोव्हेंबरला जारी केले जाणार आहेत. य़ानंतर २४ ते २८ डिसेंबरच्या मध्ये बाँड खरेदी केले जाऊ शकतात. हे बाँड १ जानेवारी २०१९ला दिले जाणार आहेत. १४ ते १८ जानेवारी दरम्यान पुन्हा त्याची विक्री सुरु होईल. २२ जानेवारीला ते ग्राहकाला दिले जातील. त्यानंतर शेवटी ४ ते ८ जानेवारी दरम्यान पुन्हा विक्री केली जाईल. १२ फ्रेब्रुवारीला ते ग्राहकांना दिले जातील.

Leave a Comment