मोदी सरकार फक्त ५९ मिनिटात मिळवून देणार १ कोटीचे कर्ज

narendra-modi
नवी दिल्ली – आता केवळ ५९ मिनिटात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांना (एमएसएमई) कर्ज मिळणार आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांनी जीएसटी नोंदणीकृत उद्योजकांना १ कोटी रुपयांच्या कर्जावर २ टक्के सूट मिळेल, असे घोषित केले आहे. एमएसएम उद्योजकांसाठी सपोर्ट आणि आउटरिच कार्यक्रमाचे नवी दिल्ली येथे त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.

आता बँकेच्या मोठमोठाल्या रांगेत लघू उद्योजकांना उभे रहावे लागणार नाही. जीएसटी भरणाऱ्या प्रत्येक एमएसएमई उद्योजकाला त्यासाठी ऑनलाईन कर्ज मिळणार आहे. विशेष म्हणजे कर्ज मिळवण्याची ही प्रक्रिया फक्त ५९ मिनिटात मान्य केली जाईल आणि आवेदनकर्त्याला घरबसल्या कर्ज मिळेल, असेही पंतप्रधानांनी यावेळी प्रतिपादन केले.

तसेच, १ कोटी रुपयांच्या कर्जावर २ टक्के सूट जीएसटी पोर्टलवर नोंदणी झालेल्या उद्योजकाना मिळणार आहे. तर, आपले उत्पादन वाहून नेण्यासाठी मिळणारे शिपमेंट क्रेटीड उद्योजकांना ३ टक्के वरुन वाढून ५ टक्के पर्यंत वाढवण्यात आले आहे. शासकीय कार्यालयात लागणारे सामान विकत घेताना महिला उद्योजकांना प्रथम प्राधान्य मिळणार आहे. तर, ३ टक्के सामान हे महिला उद्योजकांसाठी आरक्षित करण्यात आले आहे.

उद्योजकांचे उत्पादन तत्काळ विक्री होण्यासाठी गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (जेम) नावाचे नवीन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे उद्योजकांना आपले समाना आता ऑनलाईन विकता येणार आहे. तसेच या प्रणालीला मजबूत करण्यासाठी केंद्राच्या सर्व कंपण्यांना जेमची सदस्यता घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Leave a Comment