विक्रीची आकडेवारी जाहीर न केल्याने अॅपल कंपनीच्या शेअरमध्ये घसरण

apple
न्यूयॉर्क – चालू वर्षात स्मार्टफोनच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या अॅपलच्या नफ्यात ३२ टक्के वाढ झाली असली तरी अॅपल कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीची आकडेवारी जाहीर न केल्याने घसरण झाली. ६.५० टक्क्याने अॅपलचे शेअर घसरुन २०७.७८ डॉलरवर पोहोचले.

चालू वर्षात अॅपलच्या नफ्यात ३२ टक्के वाढ झाली आहे. नफा थेट १४.१३ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. तर कंपनीच्या महसुलात २० टक्के वाढ होऊन ६२.२९ अब्ज झाला आहे. याबाबत कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक म्हणाले की, दोन अब्ज आयओस डिव्हाईस आम्ही तयार केले आहेत. अॅपल स्टोअरने १० वा वर्धापनदिन दिन साजरा केला. तर अॅपलने आजवरच्या इतिहासात प्रथमच सर्वाधिक महसूल आणि नफा कमविला आहे.

आयफोन यापुढे कोणत्याही उत्पादनाच्या विक्रीची आकडेवारी सार्वजनिक करणार नसल्याचेही कुक यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले की, भारतीय अधिकाऱ्यांशी अॅपलवरील उत्पादन शुल्काबाबत चर्चा सुरू आहे. भारतावर खूप विश्वास ठेवणारा मी व्यक्ती आहे. भारतात अॅपलकडून चांगली कामगिरी होईल, अशी अपेक्षा असल्याचेही कुक म्हणाले.

Leave a Comment