येणाऱ्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेचा अत्यंत वेगाने विस्तार होणार – अरुण जेटली

arun-jaitley
नवी दिल्ली – सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी (एमएसएमई)च्या सपोर्ट आणि आऊटरीच कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी भारत लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या अर्थव्यवस्थेतील योगदानाचे जेटली यांनी कौतुक केले. ६.५ कोटी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग ११ कोटी भारतीयांना रोजगार देत असल्याचे त्यांनी सांगितले. भारताच्या अर्थव्यवस्थेचा येणाऱ्या काळात अत्यंत वेगाने विस्तार होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

जेटली म्हणाले, की भारताची अर्थव्यवस्था २०१४ला भाजप सरकार येण्यापूर्वी जगातील नवव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था होती. ती आता ६व्या क्रमांकावर आली आहे. भारताचा लवकरच पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये समावेश होईल, असा विश्वास जेटली यांनी व्यक्त केला. त्यांनी पुढे सांगितले की, सरकार निधी म्हणून ९० हजार कोटी रुपये थेट लाभार्थ्यांसाठी राखून ठेवत आहे. लोकांना याचा थेट फायदा मिळेल.

Leave a Comment