नरभक्षक अवनी वाघीण अखेर ठार

avani
महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्यातील पांढरकवडा वनक्षेत्रात अवनी ( टी १ )या नरभक्षक वाघिणीला शुक्रवारी रात्री ठार करण्यात वनविभागाला अखेर यश आले आहे. या वाघिणीने दोन वर्षात १४ माणसांचा जीव घेतला होता. या वाघिणीला टिपण्यासाठी २०० लोकांची टीम काम करत होती. या वाघिणीला ठार करू नये यासाठी सेव अवनी या नावाने सेव टायगर या एनजीओ ने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती मात्र या न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आणि वाघिणीची शिकार केली गेली.

डीएनए चाचणी, कॅमेरे ट्रँप्स, पंजाची निशाने यावरून वनतज्ञांनी हि वाघीण ५ वर्षाची असावी असे निदान काढले होते. हि गेले काही महिने नरभक्षक झाली होती आणि माणसाच्या मासासाठी चटावली होती. त्यामुळे ती उपद्रवी ठरली होती. तिला आकर्षित करण्यासाठी खास प्रकारचा जेन्ट्स परफ्युम वापरला गेला. तिच्या हालचाली टिपण्यासाठी १०० कॅमेरे लावले गेले होते.

शिकारी कुत्री, पॅराग्लायडर्स यांचीही मदत घेण्यात आली होती. हैद्राबाद येथील शार्पशुटर नवाब शौकत यांना खास बोलावले गेले होते. शौकत यांना ५०० जंगली जनावरे ठार करण्याचा अनुभव आहे.

Leave a Comment