जगातील दोन नंबरची पेमेंट प्रोसेसर कंपनी मास्टरकार्ड ने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अमेरिकन सरकारकडे तक्रार केली आहे. या तक्रारीत मोदी यांनी भारताचे स्थानिक पेम्नेत नेटवर्क रूपेचा वापर म्हणजे राष्ट्रकार्य असल्याचे सार्वजनिक रित्या विधान केल्याने मास्टरकार्डला नुकसान होत असल्याचे म्हटले आहे. आकडेवारीनुसार मोदी यांनी रुपेला प्रमोट केल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम मास्टरकार्ड, व्हिसा कार्ड याच्या व्यवसायावर झाल्याचा आरोप केला गेला आहे.
मास्टरकार्डची मोदींविरोधात तक्रार
मोदी यांनी रुपे पेमेंटचा वापर भारतीयांनी करावा कारण ते देशाची सेवा केल्याप्रमाणेच असल्याचा उल्लेख सार्वजनिक सभेतून केला होता. ते म्हणाले होते या पेमेंट सिस्टीममध्ये आकारली जाणारी ट्रान्झॅक्शन फी देशातच राहणार आहे आणि त्यातून देशातील रस्ते, शाळा, हॉस्पिटल उभारली जाणार आहेत. या आवाहनाला भारतीय जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला असून सध्या ५० कोटी भारतीय या पेमेंट सर्व्हिसचा वापर करत आहेत. यामुळे आम्हाला नुकसान सोसावे लागत आहे असे मास्टरकार्डचे म्हणणे आहे. मास्टरकार्ड, व्हिसा कार्ड जी ट्रान्झॅक्शन फी आकारतात त्याच्या निम्मी फी रूपे कडून आकारली जाते.