एक लाख कोटींचा टप्पा जीएसटी महसुलाने ओलांडला – अर्थमंत्री

arun-jaitley
नवी दिल्ली – वस्तु आणि सेवा कराच्या (जीएसटी) महसुली रक्कमेत एक लाख कोटींची वाढ झाली असून अशा प्रकारची वाढ दुसऱ्यांदा झाली आहे. अशा प्रकारची तब्बल पाच महिन्यानंतर वाढ दिसुन आली आहे. नुकतेच, जीएसटी महसुलाने एप्रिल महिन्यात एक लाख कोटीचा टप्पा ओलांडला होता.

या संदर्भातील माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ट्विटरवरुन दिली. एक कोटीपेक्षा जास्त रक्कम ऑक्टोबर महिन्यातील जीएसटी कर संकलनात जमा झाल्याचे जेटलींनी सांगितले. जीएसटीचे हे यश कराचे माफक दर, कर संकलनातील कमी चोरीचे प्रमाण आणि लपवा छपवी नसने, सुसुत्रता आणि इतर कर संस्थाची ढवळाढवळ नसणे हे आहे.

याबाबत अर्थमंत्रालयाने दिलेल्या अहवालानुसार, ऑक्टोबर महिन्यात जीएसटीचा सकल महसूल एक लाख ७१० कोटी होता. पैकी केंद्रीय वस्तु सेवा आणि कर (सीजीएसटी) १६ हजार ४६४ कोटी तर राज्य वस्तु सेवा आणि कर (एसजीएसटी) २२ हजार ८२६ कोटी होता. तर एकत्रीत वस्तु सेवा आणि कराचा (आयजीएसटी) हिस्सा ५३ हजार ४१९ कोटी होता. ज्यात २६ हजार ९०८ कोटींचे आयातशुल्क आणि ८००० कोटींच्या सेसचा सामावेश होता.

Leave a Comment