यापुढे ईएमआयवर भरता येणार रुग्णालयाचे बिलही; अवघे शून्य ते ६% व्याज

sonia-basu
पुणे – ईएमआयवर वाहन, घर, व्यवसाय आणि शिक्षण कर्जे मिळतात. पण हाॅस्पिटलमध्ये एखादा रुग्ण दाखल झाल्यानंतर येणारे जादा रकमेचे बिल हे प्रत्येकालाच धडकी भरवणारे असते. अधिक पैशांची शस्त्रक्रिया किंवा तपासणी करण्यासाठी गरज असते. पुण्यातील डाॅ. साेनिया बासू अाणि त्यांचे बँकिंग क्षेत्रातील सहकारी परवेझ हुसैन यांनी ही समस्या हेरून शून्य ते ६ टक्के या अल्प व्याजदरात रुग्णांना १ ते ५ वर्षांपर्यंत कर्ज मिळवून देण्यासाठी ‘हेल्थ फीन’ या उपक्रमाद्वारे पुढाकार घेतला अाहे. रुग्णांना त्यामुळे तातडीने कर्ज मिळून त्यांना अावश्यक याेग्य उपचार घेता येतील. ईएमअायच्या स्वरूपात उपचारांचे बिल भरता येणार असल्याने रुग्णाला दिलासा मिळणार अाहे.

रुग्णावर हाॅस्पिटलचे बिल भरण्यासाठी दागिने माेडणे, जमीन जुमला विकणे, उधारी किंवा सावकारी कर्ज घेण्याची वेळ येते. देशभरातील केवळ ८ ते १० टक्के नागरिकांनीच आजमितीस आरोग्य विमा उतरवलेला आहे. विमा पाॅलिसीचेही विशिष्ट प्रकारचे नियम असल्याने अाणि ठरावीक रकमेपुरती पाॅलिसीची तरतूद असल्यामुळे रुग्णाला अडचणी भेडसावतात. पाॅलिसीच्या ठरावीक तरतुदीपेक्षा अधिक बिल अाल्यानंतर त्यांचीही पैशांची जमवाजमव करण्यासाठी धावपळ उडते. रुग्ण अथवा त्यांचे नातेवाईक यांची अशा वेळी पैसे परतफेड करण्याची क्षमता पाहून एक तास ते अाठ तासांत कर्ज मिळवून देण्याची कल्पना डाॅ. साेनिया बासू यांना अाली.

डाॅ. साेनिया बासू यांनी सांगितले की, हाॅस्पिटलचे बिल भरताना रुग्णालयात दाखल हाेणाऱ्या रुग्णांना माेठी समस्या जाणवत असल्याचे लक्षात अाले. त्यानुसार त्यांना विविध अाजारांवर उपचार घेण्यासाठी अल्प व्याजदरात कशा प्रकारे कर्ज उपलब्ध करून देता येईल यावर बँकिंग क्षेत्राचा अनुभव असलेले सहकारी परवेझ हुसैन यांच्याशी चर्चा केली. विविध स्टार्टअप बँकांशी समन्वय साधण्यात अाला. त्यानुसार शून्य ते ६ टक्के दराने रुग्णांना एक वर्षापर्यंत काही बँका व वित्तीय संस्थांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. कर्जावरील व्याजाचा भार हा संबंधित रुग्णालय उचलत अाहे, हाही एक दिलासा आहे.

सुरुवातीच्या टप्प्यात ही सुविधा पुणे, मुंबर्इ, नागपूर, चेन्नई, हैदराबाद, बंगळुरू येथील १०० रुग्णालयांत उपलब्ध करून देण्यात अाली अाहे. कमीत कमी दहा हजारांपासून कर्ज रुग्णांना तत्काळ उपलब्ध हाेऊ शकते. त्यासाठी रुग्ण दाखल असण्याची अावश्यकता नसून रुग्णालयातील विविध चाचण्यांसाठीही त्याला कर्ज उपलब्ध हाेर्इल, असेही त्या म्हणाल्या. अधिक माहितीसाठी ७०३०७६०७६० या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *