नवी दिल्ली – देशातील सर्व रेल्वे विभागाचे अनारक्षित तिकिट आता मोबाईलवरुन काढता येणार आहे. रेल्वेने ही सुविधा डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी सुरू केल्यामुळे अँड्राईड, आयओएस आणि विंडोज फोनवरुन अनारक्षित तिकिट, मासिक पास तसेच प्लॅटफार्म तिकिट काढता येणार आहे.
आजपासून मोबाईलवरुन काढा रेल्वेचे अनारक्षित तिकिट
आता प्रवाशांना या सुविधेमुळे रांगेत उभे राहण्याची गरज नाही. फक्त आरक्षित तिकिटे काढण्यासाठीच यापूर्वी ऑनलाईन सुविधेचा वापर करता येत होता. पण प्रवाशांना आता या सुविधेमुळे अनारक्षित तिकिटही काढता येणार आहे. ही सुविधा देशातील सर्व रेल्वे विभागांमध्ये आजपासून सुरू करण्यात आली आहे.
मध्य रेल्वेच्या निवडक स्थानावर डिसेंबर २०१४मध्ये मोबाईलद्वारे अनारक्षित तिकिट काढण्याचा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबवला गेला होता. त्यानंतर २०१५-१७ दरम्यान चेन्नई, दिल्ली, कोलकाता आणि सिकंदराबाद या महानगरात हा उपक्रम सुरू करण्यात आला.