फ्लेक्स पाय ठरला जगातला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन

royule
सॅमसंगला मागे टाकत अमेरिकन स्मार्टफोन कंपनी रोयु (roayu)ने गुरुवारी चीनमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात जगातला पहिला फोल्डेबल स्मार्टफीब फ्लेक्स पाय( flex pai) सादर केला आहे. हा फोन टॅब्लेट प्रमाणे आहे मात्र तो फोल्ड होतो. सॅमसंगचे सीइओ डीजे कोह यांनी काही दिवसांपूर्वी सॅमसंग त्यांचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन पुढील महिन्यात सादर करेल आणि तो टॅब्लेट स्वरुपात असेल असे संकेत दिले होते मात्र त्यापूर्वीच फ्लेक्स पाय सादर केला गेला आहे.

या फोनला ७.८ इंची स्क्रीन दिला गेला असून तो फोल्ड केल्यावर ४ इंची बनतो. हा फोन तीन व्हेरीयंट मध्ये आहे. त्याला प्रथमच स्नॅपड्रॅगन ८५० प्रोसेसर दिला गेला असून फास्ट चार्जिंग सपोर्ट करणारी बॅटरी दिली गेली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार ती एका तासात ० ते ८० टक्के चार्ज होते. फोटो साठी १६ व २० एमपीचे कॅमेरे असून यावरच सेल्फी काढता येणार आहेत.

हा फोन तीन व्हेरीयंट मध्ये आहे. ६ जीबी रॅम १२८ जीबी स्टोरेजची किंमत ९५४०० रुपये असून ८ जीबी रॅम १२८ जीबी स्टोरेज साठी १ लाख ६ हजार तर ८ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेजसाठी १ लाख ३८ हजार रु. मोजावे लागणार आहेत. हा फोन फिंगरप्रिंट सेन्सरसह आहे.

Leave a Comment