मध्यम आणि लहान शहरातून ईकॉमर्स क्षेत्राची लक्षणीय वाढ

Untitled-1
ऑनलाईन खरेदी अथवा मोबाईल इंटरनेट वापरात दिवसेंदिवस वाढ होत चालली असताना मोठ्या शहराच्या तुलनेत मध्यम आणि लहान शहरातील ग्राहकांच्या खरेदी सवयीत मोठे बदल झाल्याचे दिसून येत असून ई कॉमर्स क्षेत्रातील फ्लिपकार्ट, अमेझोन यासारख्या कंपन्यांनी या बदलाची नोंद घेऊन त्यांच्या नीती आणि धोरणात आवश्यक ते बदल सुरु केल्याचे दिसून येत आहे.

मध्यम आणि लहान शहरात मोबाईल इंटरनेट अथवा अन्य इंटरनेट सेवा वापरण्याचे प्रमाण वाढते असून ई कॉमर्स कंपन्याचा नफा वाढण्यात या भागाचे मोठे योगदान मिळते आहे. गतवर्षी फ्लिपकार्टला झालेल्या एकूण नफ्यातील ६५ टक्के वाटा लहान व मध्यम शहरातून मिळाला आहे तर अमेझोनला याच शहरातून ८५ टक्के ग्राहक मिळाले आहेत. त्यामुळे टॉप ब्रांड आता केवळ महानगरापुरते मर्यादित राहिलेले नाहीत तर छोट्या शहरातूनहि त्यांना तितकीच मागणी येते आहे.

यातच ई कॉमर्स कंपन्या देत असलेली सूट, इएमआय, सुपर व्हॅल्यु सारख्या ऑफर छोट्या शहरातील ग्राहकांना या खरेदीकडे वळवीत आहेत असेही दिसून येत आहे.

आकडेवारीनुसार २०१५ साली ग्रामीण अथवा लहान शहरात मोबाईल इंटरनेट वापरणारे १२.९ कोटी युजर होते. २०२० सालापर्यंत शहरी भागात हि संख्या ३५.८ कोटींवर तर मध्यम आणि लहान शहरात ती ३८.८ कोटींवर जाण्याचे संकेत मिळत आहेत. या भागातील युजरना स्मार्टफोन हि गरज असल्याचे पटले आहे आणि त्यामुळे या भागात स्मार्टफोनच्या विक्रीतही १८ टक्के वाढ नोंदविली गेली आहे.

Leave a Comment