काश्मीर महाराजांच्या दुर्मिळ व्हिंटेज कारचा लिलाव

harising
लंडन येथे २ डिसेंबरला होणाऱ्या एका लिलावात काश्मीरचे महाराज हरिसिंग यांची दुर्मिळ व्हिंटेज कार आकर्षणाचे केंद्र बनली आहे. बोनहॅम्स बाँड स्ट्रीट सेल मध्ये तिचा लिलाव होणार आहे. पूर्वीच्या सर्वोत्कृष्ट ब्रिटीश कार्स मध्ये तिची गणना केली जाते. १९२४ सालची हि वॉल हॉक्स ३०-९८ ओइ वेलेक्स टूरर कार आहे.

या कारला ३,३०,००० पौंड म्हणजे सव्वा तीन कोटी रु. किमान किंमत मिळेल अशी अपेक्षा आहे. महाराजांनी या कारमध्ये वेळोवेळी त्यांच्या सोयीनुसार बदल केले होते त्यामुळे या कार मध्ये अनेक सोयी आहेत. हरिसिंग हे जम्मू काश्मीरचे शेवटचे राजे होते आणि त्यांना हि राजगादी त्यांचे काका प्रतापसिंग यांच्य्कडून वारसा हक्काने मिळाली होती. राज्यसभेचे माजी सदस्य आणि माजी केंद्रीय मंत्री कर्णसिंग हे हरिसिंग यांचे पुत्र आहेत.

Leave a Comment