जगातील सर्वात श्रीमंत माणसाचे दोन दिवसांत बुडाले ७९ हजार कोटी

jeff-bozes
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या जेफ बेजोसला सर्वात मोठा धक्का बसला आहे. गेल्या दोन दिवसांत अमेझॉनचा फाऊंडर जेफ बेजोसने ७९ हजार कोटी रुपये गमावले आहेत.

जगातील श्रीमंतांची माहिती देणाऱ्या फोर्ब्स मासिकाच्या मते, कंपनीचे शेअर गुंतवणूकदारांनी विकायला सुरूवात केल्यामुळे त्याचा सर्वात मोठा फटका जेफ बेजोसला झाला. अवघ्या दोन दिवसांमध्ये त्याला ७९ हजार कोटींचे नुकसान सहन करावे लागले. असे असले तरी अजूनही तो जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत आपले अग्रणी स्थान टिकवून आहे. सर्वात श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर बिल गेट्स आणि तिसऱ्या स्थानावर वारेन बफे आहेत.

फोर्ब्सच्या मते, अमेझॉनने गेल्या आठवड्यात त्यांच्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीमध्ये झालेल्या बिझनेसची घोषणा केली. अपेक्षेपेक्षा कंपनीची मिळकत कमी झाल्यामुळे जगभरातील गुंतवणुकदारांनी अमेझॉनमध्ये त्यांचे असलेले शेअर विकायला सुरूवात केली. गेल्या एक महिन्यात अमेझॉनचे शेअर २३ टक्क्यांनी घसरले आहेत. यामुळे जेफ बेजोसच्या संपत्तीत घट झाली. अमेझॉनमध्ये जेफ बेजोसचा १६ टक्के हिस्सा आहे.

जेफ बेजोसची एकूण संपत्ती सध्या १२, ७६० कोटी डॉलर म्हणजे साधरणपणे ९.१८ लाख कोटी रुपये आहे. तिसऱ्या स्थानावर हॅथवे बर्कशायरे मालक वारेन बफे आहेत. त्यांची एकूण संपत्ती ८, २४० कोटी डॉलर म्हणजे भारतीय रुपयांप्रमाणे ५.९३ लाख कोटी रुपये आहे.

Leave a Comment