‘कोका कोला’शी ‘डॉमिनोज’चा काडीमोड

dominos
नवी दिल्ली – पिझ्झा बनवणारी कंपनी डॉमिनोज आणि सॉफ्टड्रिंक बनवणारी कंपनी कोका कोला या दोघांमधील २० वर्षे जुनी पार्टनरशीप संपुष्टात आली असून तुम्हाला यापुढे आता डॉमिनोजच्या कोणत्याही आउटलेटमध्ये कोका कोलाचे कोणतेही उत्पादन मिळणार नाहीत. कंपनीने हा निर्णय खर्च कमी करण्यासाठी घेतला आहे.

डॉमिनोज ग्राहकांना लवकरच पिझ्झासोबत कोका कोलाच्या ऐवजी पेप्सिकोचे सॉफ्ट ड्रिंक्स देणार आहे. यासंबंधी घोषणा डॉमिनोज हा ब्रांड चालवणारी कंपनी जुबिलिएंट फूडवर्क्स लिमिटेड कंपनीने केली असल्यामुळे डॉमिनोजच्या आउटलेटमध्ये आता यापुढे कस्टमर्सला पेप्सी मिळणार आहे. आता केवळ मॅकडोनल्डच्या आउटलेटवर कोका कोला मिळणार आहे.
ग्राहकांना आतापर्यंत पिझ्झा हटच्या पेप्सी मिळत होती. पण डॉमिनोजच्या आउटलेटमध्ये आता पेप्सी उपलब्ध होणार आहे. कोका-कोला केवळ आता मॅकडोनल्डच्या शॉपमध्ये मिळणार आहे. देशभरात डॉमिनोजचे एकूण ११४४ आउटलेट आहेत. पिझ्झा हटच्या आउटलेटची संख्या तुलनेने अतिशय कमी आहे. जगातील ८५ देशांमध्ये डॉमिनोजचे आउटलेट आहेत आणि कोका-कोलासोबत हा करार संपूर्ण जगभरासाठी करण्यात आला होता.

कोका कोला डॉमिनोजच्या या निर्णयामुळे चांगलीच अडचणीत येण्याची शक्यता आहे. कोका कोला ब्रँडला मार्केटमध्ये याचा दणका बसण्याची शक्यता आहे. याचा कोका कोलाच्या विक्रीवरही परिणाम होणार आहे. आता कोका कोलासोबत केवळ मॅकडोनल्ड टायअपमध्ये आहे. जेव्हाकी पिझ्झा हट, केएफसी आणि टाको बेल सारखे ब्रँड पेप्सिकोसोबत अनेक वर्षांपासून जुळलेले आहेत.

Leave a Comment