बिहार मधले सुंदर काष्ठशिल्पे असलेले नेपाळी मंदिर दुरावस्थेत

hajipur
बिहारचा हाजीपुर मधील कौनहारा घाटावर असलेले आणि बिहारचे खजुराहो अशी ओळख मिळविलेले ५५० वर्षे जुने नेपाळी मंदिर हा काष्ठशिल्पांचा अजोड नमुना मानले जाते. वास्तविक हे शिवमंदिर आहे मात्र नेपाळी सेना कमांडर मातबरसिंग थापा यांनी ते १८ व्या शतकात उभारले त्यामुळे त्याला नेपाळी मंदिर किंवा नेपाळी छावणी असेही म्हटले जाते. हे मंदिर सध्या पुरातनतत्व विभागाच्या ताब्यात असले तरी त्याची देखभाल व्यवस्थित होत नसल्याने ते मोडकळीस आले आहे.

nepali
या मंदिराचे बांधकाम नेपाळी शैलीत म्हणजे पॅगोडा पद्धतीचे आहे. येथे लाकडी खांब, छतावर विविध प्रकारची मैथुन शिल्पे अतिशय सुंदर प्रकारे कोरली गेली आहेत. कामसूत्रातील अनेक पोझ येथे दाखविल्या गेल्याने त्याला बिहारचे खजुराहो असे म्हटले जाते. हे मंदिर गंगा आणि गंडकी आणि सोन या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसले आहे. मात्र येथील लाकडांना वाळवी लागल्याने त्यावरील कोरीव कामाची दुरवस्था झाली आहे.

या मंदिरात आजही अनेक पर्यटक येतात मात्र रात्री येथे प्रवेश दिला जात नाही. असे सांगतात कि रात्रीच्या वेळी या मंदिरातून अनेक आवाज येतात. घंटानाद होतो तसेच डमरू वाजल्याचे आवाज येतात. येथील शिवपिंडीतून रात्री प्रकाश बाहेर पडतो असेही सांगितले जाते. रात्रीच्या वेळी शिव आणि शक्ती यांचे मिलन या मंदिरात होते असा समज आहे. यामुळे रात्री मंदिर बाहेरच्या लोकांना बंद केले जाते असे म्हणतात.

Leave a Comment