पुणे प्लांटमध्ये टाटा हॅरिअरचे उत्पादन सुरु

harrier
टाटा मोटर्सची बहुप्रतीक्षित एसयूव्ही हॅरिअर सोमवारी सादर करण्यात आली असून या एसयूव्हीचे उत्पादन पुणे प्लांटमध्ये सुरु झाले आहे. लँडरोव्हरच्या प्लॅटफॉर्मवर हि गाडी बनविली जात आहे. गेले अनेक दिवस हि गाडी टेस्टिंग दरम्यान रस्त्यावर दिसत होती.

या एसयूव्हीला २.० लिटरचे ४ सिलिंडर इंजिन दिले जात असून डीझेल आणि पेट्रोल अश्या दोन्ही व्हेरीयंट मध्ये ती उपलब्ध होत आहे. गाडीचे डिझाईन एसयूव्ही इम्पॅक्ट २.० थीमवर केले गेले असल्याचे समजते. या एसयुव्हीला ६ स्पीड मॅन्यूअल आणि ६ स्पीड ऑटोमेटिक गिअरबॉक्स दिला जात आहे. या एसयूव्हीची सुरवातीची एक्स शोरूम किंमत १५ लाखपर्यंत असेल असेही समजते. जीप कंपास बरोबर या गाडीला स्पर्धा करावी लागेल.

Leave a Comment