डबल डिस्प्लेसह आला नुबिया एक्स स्मार्टफोन

nubiax
झेडटीईचा सबब्रांड नुबियाने त्यांचा नवा नुबिया एकस स्मार्टफोन दोन डिस्प्लेसह बाजारात आणला असून त्याला स्नॅपड्रॅगन ८४५ प्रोसेसर दिला गेला आहे. या फोनला ६.२६ आणि ५.१ इंची डिस्प्ले दिले कॉर्निंग ग्लास ३ प्रोटेक्शनसह दिले गेले आहेत. अँड्राईड ओरिओ ८.१ ओएस असून हा फोन ६ जीबी आणि ८ जीबी रॅम आणि ६४,१२८, २५६ जीबी स्टोरेज अश्या व्हेरीयंट मध्ये उपलब्ध आहे. विशेष म्हणजे याला मायक्रोकार्ड सपोर्ट नाही.

फोनला ड्युअल कॅमेरा असून १६ एमपी व २४ एमपीचे रिअर कॅमेरे आहेत मात्र फ्रंट कॅमेरा नाही. अर्थात फोनला मागच्या बाजूलाही डिस्प्ले असल्याने सेल्फी काढता येते. ६ जीबी रॅम, ६४ जीबी स्टोरेजसाठी ३२९९ युआन म्हणजे ३५ हजार रु. मोजावे लागणार आहेत. ८ जीबी रॅम १२८ जीबी स्तोरेज्साठी ३९२०० तर २५६ जीबी स्टोरेज साठी ४४५०० रु. द्यावे लागतील. फोन ला ३८०० एएमएचची क्विकचार्ज सपोर्ट बॅटरी दिली गेली आहे.

Leave a Comment