गाईची गळाभेट घेण्यासाठी अमेरिकेत गर्दी

galabhet
भारतात गाय या पशुला देवता मानले जाते आणि विविध प्रसंगी तिची पूजाही केली जाते. मात्र तरीही गाईला मिठी मारण्यासाठी आपल्याकडे कधी गर्दी झाल्याचे दिसत नाही. अमेरिकेतील जनता आजकाल गाईला जवळ घेऊन बसण्यासाठी एकच गर्दी करत असून त्यासाठी हजारो रु.मोजत असल्याचे दिसून आले आहे. गोशालेबाहेर या साठी रांगा लागत असल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे.

अर्थात यामागे अनेक करणे दिली जात आहेत. पैकी संशोधनातून प्राणी हे माणसाचे सर्वात चांगले मित्र असतात हे पूर्वीच सिद्ध झाले आहे. यामुळेच अनेक लोक नातेवाईक, मित्र याच्याबरोबर वेळ घालविण्याऐवजी पाळीव प्राणी पाळतात आणि त्यांच्यासोबत वेळ घालवितात. प्राण्यांशी खेळणे, त्याच्यासोबत वेळ घालविणे यामुळे मानवी मेंदूला शांतता मिळते असेही दिसून आले आहे. गाईच्या संगतीत वेळ घालविणे हा त्याचाच एक भाग आहे.

अमेरिकेत यासाठी काऊ कडिंग नावाने एक मोहीम सुरु केली गेली आहे. यात ९० मिनिटे म्हणजे दीड तासासाठी ३०० डॉलर्स आकारले जातात आणि हा सर्व वेळ लोक गाईच्या अगदी निकट, मिठी मारून वेळ घालवितात. या गळाभेटीनंतर खूप रिलॅकस वाटते असा अनुभव सांगितला जातो.

यामागे असे विज्ञान सांगितले जाते कि गाईच्या शरीराचे तापमान माणसाच्या शरीर तापमानापेक्षा अधिक असते तसेच गाईच्या हृदयाची गतीही अधिक असते. अश्या वेळी गाईच्या खूप निकट बसले तर मानवी शरीराची तापमान आणि हृदय गती सामान्य होते व यामुळे ताणतणाव कमी होऊन मन ताजेतवाने बनते.

Leave a Comment