अरुणाचलमधील ‘पर्पल टी’ला विक्रमी बोली

purple-tea
प्रथमच अरुणाचलमधील जांभळ्या रंगाच्या दुर्मिळ ‘पर्पल टी’ची विक्री करण्यात आली आहे. पहिल्यांदाच देशातील पहिल्या ‘पर्पल टी’ची विक्री ‘गुवाहाटी टी ऑक्शन सेंटर’मध्ये करण्यात आली. २४ हजारांहून अधिकची बोली प्रतिकिलोसाठी यावेळी लावण्यात आली. हा दुर्मिळ जांभळ्या रंगाचा चहा दुगर कन्झ्युमर प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने खरेदी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जगभरातील पाहुण्यांच्या चहापान कार्यक्रमासाठी पुढील वर्षी अहमदाबादमध्ये होणाऱ्या एका परिषदेत तो वापरण्यात येणार आहे.

काहीशी ग्रीन टी सारखीच या चहाची चव ही असल्याचे म्हटले जात आहे. अरुणाचलमधील घनदाट जंगलात काही वर्षांपूर्वी या चहापत्तीचा शोध लागला. जवळपास १० हजार किलो पानांपासून १ किलो चहापत्ती तयार केली जाते. या चहाच्या रोपांमध्ये मोठ्या प्रमाणात अँथोसायनिन असल्यामुळे चहापत्तीला गडद जांभळा रंग प्राप्त होतो. याच टी ऑक्शन सेंटरमध्ये काही महिन्यांपूर्वी आसामी चहावर तब्बल ३९ हजारांची बोली लागली होती. १ किलो मनोहारी गोल्डन टीवर जवळपास ३९ हजारांची बोली लावण्यात आली होती. गुवाहटीस्थित एका चहा विक्री करणाऱ्या व्यापारानं ती खरेदी केली होती.

Leave a Comment