मोठ्या आशेसह भारतीय बाजारात लॉन्च झाला OnePlus 6T

oneplus
नवी दिल्ली – चीनची स्मार्टफोन बनवणारी आघाडीची कंपनी वनप्लस मोठ्या आशेसह भारतीय बाजारात दाखल होत असून त्यांनी नुकताच आपला फ्लॅगशिप असलेला वनप्लस ६टी हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च केला आहे.

वनप्लस ६टी या मोबाईलध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज अशा सुविधा उपलब्ध असून ३७ हजार ९९९ एवढी या मोबाईलची किंमत आहे. शिवाय याच प्रकारत मिडनाईट ब्लॅ्क आणि मिरर ब्लॅक या रंगातही हा मोबाईल उपलब्ध आहे. मिडनाईट ब्लॅ्क या मोबाईलमध्ये ८ जीबी आणि १२८ जीबी स्टोरेज क्षमता अशी सुविधा आहे. तर मिरर ब्लॅक या प्रकारात ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज क्षमता आहे. या मोबाईलची अनुक्रमे किंमत ४१ हजार ९९९ आणि ४५ हजार ९९९ एवढी आहे.

आम्ही ग्राहकांना उत्तोमोउत्तम सेवा पुरविण्यासाठी बांधील असल्याचे वनप्लसचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पेटे लाउ यांनी सांगितले. हा १ नोव्हेंबरपासून मोबाईल अॅमेझॉन या संकेतस्थळावर ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध असेल. ज्यात आयसीआयसीआय आणि सीटी बॅकेंच्या डेबीट कार्डवर २००० हजार रुपयांची कॅशबॅक सुविधा उपलब्ध आहे. तर २ नोव्हेंबरपासून वनप्लस ६ टी ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारच्या बाजारात उपलब्ध असेल.

Leave a Comment