गुगल करणार कृत्रिम मानवी बुद्धमित्तेतून सामाजिक प्रश्नांची उकल

google
सॅन फ्रान्सिस्को – सामाजिक प्रश्नांवर कृत्रिम मानवी बुद्धिमत्तेच्या सहाय्याने उपाय शोधण्यासाठी गुगलकडून विविध प्रकल्पांसाठी २५ मिलियन डॉलरची मदत विविध संस्थांना केली जाणार आहे.

‘कृत्रिम मानवी बुद्धिमत्ता आव्हाना’साठी गुगलकडून निधी दिला जाणार असल्यामुळे समाजातील मोठ्या समस्या सोडविण्यासाठी मदत होणार आहे. ही मदत निवडक संस्थांना केली जाणार असून गुगल कृत्रिम मानवी बुद्धिमत्ता क्षेत्रातील तज्ज्ञाकडून त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. गुगल एआयचे अधिकारी जेफ डीन यांनी ही माहिती ब्लॉगच्या माध्यमातून दिली आहे. लाँचपॅड अॅसलेरटरमध्ये निवडक सामाजिक संस्थांना सहभागी करुन घेण्यात येणार आहे.

Leave a Comment