हर्ले डेव्हिडसनने २ लाख ३८ हजार बाईक परत मागविल्या

harley
अमेरिकेची जगप्रसिद्ध ऑटो कंपनी हर्ले डेव्हिडसनने २ लाख ३८ हजार बाईक परत मागविल्या आहेत. या बाईक मध्ये क्लचची समस्या आल्याने हा निर्णय घेतला गेल्याचे सांगितले गेले आहे. विशेष म्हणजे हर्ले डेव्हिडसनची बाईक परत मागविण्याची गेल्या वर्षातील हि चौथी वेळ आहे.

मिळालेल्या माहितीनुसार २०१७-१८ मध्ये कंपनीने त्यांच्या टुरिंग, ट्राइक, सीव्हीओ टुरिंग आणि २०१७ मधली सोफ्टेल या मॉडेलच्या बाईक परत मागविल्या होत्या. एवढेच नव्हे तर क्लच खराब असल्याच्या तक्रारी आल्यानंतर २०१६ मध्ये १४ प्रकारच्या मॉडेल्सच्या २७२३२ बाईक, २०१५ मध्ये ४५९०१ युनिट तर २०१३ मध्ये २९०४६ युनिट परत मागविली गेली होती. हर्लेच्या इलेक्ट्रिक मॉडेल आणि छोट्या बाईक लवकरच लाँच केल्या जाणार आहेत असेही समजते.

Leave a Comment