दुर्योधनाचा या ठिकाणी झाला होता मृत्यू

duryodhan
महाभारत युद्धात कौरवांचा पराभव करून पांडव विजयी झाले होते आणि आजही कुरुक्षेत्रावर महाभारताशी संबंधित अनेक रहस्ये सांगितली जातात. त्या काळाच्या अनेक वास्तू कुठे होत्या ते सांगितले जाते. कुरुक्षेत्रातील पिहोवा जवळ खेडी शिशगरा नावाचे छोटेसे ठिकाण या दृष्टीने महत्वाचे आहे. महाभारत युद्धात पराभव झाल्यानंतर कौरवांपैकी फक्त दुर्योधन जिवंत राहिला होता मात्र त्याने पांडवांपासून जीव वाचवा म्हणून या गावातील तलावात जलसमाधी घेतली होती असा विश्वास आहे.

दुर्योधनाला पाण्यात राहण्याची कला अवगत होती आणि तो तलावातील कमळाच्या माध्यमातून श्वसन करत होता. मात्र लवकरच पांडवांना दुर्योधन कुठे लपला आहे ते ठिकाण समजले आणि त्यांनी येथे येऊन अतिशय मानहानी कारक शब्द वापरून त्याला तलावाबाहेर येण्यास भाग पाडले होते, भीमाने त्याला गदायुद्धाचे आव्हान देऊन त्याच्या जांघेत वार करून त्याला ठार केले. गांधारीच्या आशीर्वादामुळे दुर्योधनाचे शरीर वज्रासारखे अभेद्य बनले होते मात्र त्याचा जंघा कमजोर होत्या. त्यामुळे तेथेच भीमाने प्रहार केले असे महाभारत सांगते.

या ठिकाणीच दुर्योधनावर अंत्यसंस्कार केले गेले आणि त्याच्या १३ बायका येथेच सती गेल्या होत्या. त्यामुळे आजही या गावात दुर्योधनाच्या बायकांची पूजा करण्याची प्रथा पाळली जाते.

Leave a Comment