नेटकऱ्यांना ‘अॅमेझॉन’वरील ४५ हजारांच्या स्लीपरने लावल याड

amazon
अनेक ई-कॉमर्स वेबसाईटवर सध्या सणासुदीचे दिवस सुरु असल्याने ऑफर्सची रेलचेल सुरु असून अनेक बड्या वेबसाईट्स यामध्ये थेट स्पर्धेत उतरल्या असल्याने ग्राहकांना त्याचा थेट फायदा होताना दिसतो. म्हणूनच मागील काही वर्षांपासून ऑनलाइन शॉपिंगचा वाढता ट्रेण्ड या वर्षीही पहायला मिळतो. ऑफर्स असल्याने अनेकांनी बरीच खरेदी यंदा ऑनलाइन केल्याचे दिसत आहे. पण यातच सध्या अॅमेझॉन या वेबसाईटवरील एका स्लिपर्सची चर्चा जास्त होत आहे. कारण ४५ हजार ३९३ रुपये एवढी या या स्पीपर्सची किंमत आहे.

चक्क ४५ हजारांची स्लीपर अॅमेझॉन भारतामध्ये विकत आहे. तर वेबसाईटवर व्हॅलेंटिनोज मेन्स हवायीन्स फ्लिप फ्लॉप नावाने उपलब्ध असणाऱ्या या स्पीपर पाहून नेटकरी भलतेच गोंधळात पडले आहेत. विशेष म्हणजे केवळ एक जोड बाकी असल्याने त्वरा करा असेही वेबसाईटचे म्हणणे आहे.

ग्राहकांनी कंपनीला अवघ्या काही शे रुपयांच्या स्लीपर सारख्या दिसणाऱ्या या स्लीपरच्या किंमतीवरून कमेन्ट सेक्शनमध्ये चांगलेच ट्रोल केले आहे. गुलाबी आणि काळ्या रंगाच्या या स्लीपर घेणे माझ्या आयुष्याचे ध्येय आहे पासून ते या चप्पलमध्ये ऑटोपायलेट मोड असल्यापर्यंतच्या अनेक कमेन्ट ग्राहकांनी केल्या आहेत. ग्राहकांनी दिलेल्या भन्नाट कमेन्टसलाही नेटकऱ्यांनी चांगलेच व्हायरल केले आहे.

Leave a Comment