आमदार योगेश टिळेकर यांनी खंडणीप्रकरणी फिर्यादीची मागितली माफी

yogesh-tilekar
पुणे – खंडणी मागितल्याप्रकरणी हडपसर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आमदार टिळेकर यांनी या प्रकरणाची तक्रार मागे घेण्यासाठी फिर्यादीचे हात जोडून पाय धरल्याचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यांच्या विरोधात फिर्यादी असलेल्या रवींद्र बराटे यांनी चौकशी सुरू केल्याने व्हिडिओ व्हायरल केल्याचे बोलले जात आहे.

टिळेकर यांच्यासह तिघांनी फायबर ऑप्टीकलचे काम करणाऱ्यास ५० लाखांची खंडणी मागितली असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे केंद्रात आणि राज्यात सरकार असताना अशाप्रकारे भाजप आमदारावर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. टिळेकरांबरोबर त्यांचा भाऊ चेतन टिळेकर आणि गणेश कामठे यांच्याविरोधात यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment