निवडणूक आयोगाकडे व्यापारी महासंघाची मागणी; जाहीरनाम्याबाबत राजकीय पक्षांना उत्तरदायी ठरवा

CAIT
नवी दिल्ली – निवडणुकीपूर्वी राजकीय पक्ष हे वचनांचे जाहीरनामे प्रसिद्ध करतात. त्यांना या वचनाबाबत उत्तरदायी ठरवावे, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे व्यापारी महासंघाने केली आहे.

व्यापारी संघटनांची सीएआयटी ही शिखर संस्था आहे. निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ओ.पी.रावत यांना या संघटनेने पत्र लिहिले असून त्यांनी यामध्ये म्हटले आहे की, जाहीरनाम्यात निवडणुकीपूर्वी दिलेल्या वचनाबाबत राजकीय पक्षांनी कोणती कार्यवाही केली याची माहिती द्यायला हवी. सत्ताधारी व विरोधी पक्ष निवडणूक संपताच जाहीरनाम्याकडे दुर्लक्ष करतात, याबाबत व्यापारी महासंघाचे सचिव प्रवीण खंडेवाल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

याबाबत ते म्हणाले की, केवळ मतदारांना भुलविण्यासाठीच जाहीरनामा असल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीनंतर सत्ताधारी पक्ष जाहीरनाम्यातील वचनांची पूर्तता करत नाही. त्याचप्रमाणे वचनांच्या पूर्ततेबाबत विरोधी पक्ष केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत नसल्याची टीका त्यांनी केली.