मौल्यवान सँडल्सच्या राखणीसाठी नेमला गेला कोब्रा नाग

cobra
महागड्या मौल्यवान वस्तूंच्या राखणीसाठी सुरक्षा गार्ड नेमले जाणे हे नित्याचे आहे. मात्र लंडनमध्ये एका मौल्यवान सँडल्सच्या रक्षणासाठी चक्क कोब्रा जातीचा नाग ठेवला गेल्याची घटना नोंदली गेली होती. लंडन मधील हे जगप्रसिद्ध रोड्स नावाचे स्टोअर १५० वर्षे जुने असून २००७ साली येथे माणके जडविलेले मौल्यवान सँडल्स विक्रीसाठी ठेवले गेले होते. आणि मौल्यवान रत्ने जडविलेले सँडल्स विक्रीसाठी ठेवले गेलेले ते जगातील एकमेव दुकान होते.

या स्टोअरचा हा इतिहास नुकताच एका टीव्ही डॉक्यूमेंटरी मधून सांगितला गेला. त्यावेळी एका माजी सुरक्षा रक्षकाने सांगितले, त्यावेळी हा सँडल्स हीच दुकानातील सर्वात महाग वस्तू होती आणि तिची किंमत होती ५ लाख पौंड म्हणजे साडेचार कोटी रुपये. या शिवाय अनेक मौल्यवान वस्तू येथे होत्या आणि लोक त्या खरेदी करण्यासाठी येत असत. हे दुकान १८४९ साली सुरु झाले होते.

१८९८ मध्ये या दुकानात सर्वप्रथम स्वयंचलित जिना बसविला गेला तेव्हा ग्राहक त्यावरून जाताना घाबरत म्हणून पुरुषांना १ ग्लास ब्रँडी प्यायला दिली जाई तर महिलांना भोवळ येऊ नये म्हणून मीठ हुंगायला दिले जाई. आता या दुकानाची व्याप्ती खूपच वाढली असून त्यांची ३३० रिटेल स्टोर्स आहेत आणि कर्मचारी संख्या आहे १२ हजार. लहान मुलांसाठी येथे महागड्या खेळण्याचा स्वतंत्र विभाग आहे. ब्रिटीश राजपुत्र विलियम्स आणि हॅरी बालपणी येथेच खेळणी खरेदीसाठी येत असत असेही सांगितले जाते.

Leave a Comment