आता मोबाईलवर करता येणार लॉटरी तिकीट खरेदी

lottery
लॉटरीची तिकिटे खरेदी करून स्वतःच्या नशिबाची परीक्षा करणाऱ्या लॉटरीप्रेमीना आता तिकीट खरेदीसाठी लॉटरीच्या दुकानापर्यंत जाण्याची गरज उरणार नाही. कारण आता हे ग्राहक घरबसल्या कोणत्याची राज्याच्या लॉटरीची तिकिटे मोबाईलचा वापर करून खरेदी करू शकणार आहेत. अनेक राज्यांच्या लॉटरी तिकिटांचे देशातील मुख्य विक्रेती कंपनी सुगल अँड दमाणी यांनी यासाठी एक मोबाईल अॅप तयार केले असून त्यामुळे त्याच्या व्यवसायात वाढ होण्यास हातभार लागणार आहे.

कंपनीचे सीइओ कमलेश विजय या संदर्भात म्हणाले आम्ही हे लकी खेल नावाचे अॅप लाँच करत आहोत मात्र ते फक्त अँड्राईड वर असेल. यामुळे आम्ही अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचू शकणार आहोत. शिवज खर्च बचत होणार असून दिवसरात्र कधीही तिकीट विक्री होऊ शकणार आहे. सध्या देशातील ऑनलाईन लॉटरी क्षेत्रात आमचा वाटा ७५ टक्के आहे. नवीन लॉटरी अॅप ग्राहकाला डाऊनलोड करावे लागेल आणि त्यानंतर नोंदणी करावी लागेल. ग्राहक बँक अकौंट किंवा ई वॉलेटचा वापर करून तिकिटे खरेदी करू शकतील.

यामध्ये ९ प्रकारची तिकिटे असून त्यांच्या किमती २ रु.पासून २५ रु.पर्यंत असतील आणि बक्षिसाची रक्कम १०० रु.पासून २.५ कोटी पर्यंत असेल. महागाच्या तिकिटांसाठी जॅकपॉट काढला जाईल. केरळ वगळता अन्य आठ राज्यांची तिकिटे येथे खरेदी करता येतील. केरळ मध्ये बाहेरील राज्यातील ग्राहक तिकीट खरेदी करू शकत नाहीत.

Leave a Comment