चीनच्या ४ स्मार्टफोन कंपन्यांनी भारतातून मिळविला ५० हजार कोटींचा महसूल

chinismart
चीनच्या शाओमी, विवो, अप्पो आणि हुवावे या चार स्मार्टफोन कंपन्यांनी भारतात २०१८ सालात स्मार्टफोन विक्रीतून ५१७२२ कोटींचा महसूल मिळविला आहे. २०१७ मध्ये या कंपन्यांनी २६२६२.३ कोटींचा महसूल मिळविला होता त्यात यंदा चांगलीच वाढ झाली आहे.

सर्वाधिक महसूल शाओमीने मिळविला असून त्यांनी २२९४७.३ कोटी मिळविले आहेत. त्या तुलनेत अॅपलने १३०९८ कोटी तर गुगलने ९३३७ कोटींचा महसूल मिळविला आहे. चीनी कंपन्यांनी सर्वाधिक महसूल मिलाविण्यामागे अनेक कारणे दिली जात आहेत. भारतीय बाजारात चीनी स्मार्टफोन अधिक लोकप्रिय होण्यामागे हे फोन स्वस्त आहेत हे आहेच पण भारतीय बाजारात बजेट, मिडरेंज आणि प्रीमियम अस्य सर्व कॅटेगरीत चीनी फोन आहेत.

हे फोन किमतीला कमी आहेतच पण त्यात जादा फीचर्सही दिली गेली आहेत. सध्या लोकप्रिय असलेल्या फेस अनलॉक फिचरचे चीनी फोन ५ ते ६ हजारात उपलब्ध आहेत. शिवाय चीनी कंपन्या त्यांची ब्रांड इमेज निर्माण करण्यात यशस्वी ठरल्या आहेत.

Leave a Comment