विराट कोहलीचे रेकॉर्ड तोडणार उद्धव ठाकरे – राधाकृष्ण विखे पाटील

radha-krishna-vikhe-patil
नांदेड : काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी लवकरच उद्धव ठाकरे हे विराट कोहलीचा रेकॉर्ड तोडतील. आत्तापर्यंत उद्धव ठाकरेंनी २३५ वेळा सत्तेतून बाहेर पडण्याची घोषणा केली असल्याची टीका केली आहे. नांदेडमध्ये काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेनिमित्त जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. विखे पाटील या सभेमध्ये बोलत होते. विखे पाटील यांनी यावेळी रामदास कदम यांच्यावर निशाणा साधला. सरकारविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करू असे रामदास कदम म्हणतात पण हेच कदम मुख्यमंत्र्यांचे बूट धरतात, असे टीकास्त्र विखे पाटील यांनी सोडले.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी या जनसंघर्ष यात्रेदरम्यान शासकीय अधिकाऱ्यांनाही इशारा दिला. अनेक अधिकारी आपल्याकडे लक्ष ठेवा असे आम्हाला सांगतात. आमची सत्ता उद्या येणार आहे. जे अधिकारी आमच्या विरोधात वागत आहेत त्यांनी विचार करावा, असे विखे पाटील म्हणाले.

Leave a Comment