आता रोबोच करणार रोबोंचे उत्पादन

roobo
एका रोबोने दुसरा रोबो तयार करण्याची करामत आता प्रत्यक्षात येत असून स्वीडनच्या स्विस इंजिनिअरींग ग्रुप या कंपनीने चीनच्या शांघाय येथे यासाठी १५० दशलक्ष डॉलर्सची गुंतवून करून कारखाना उभारला आहे. या नव्या एबीबी कारखान्याचे काम २०२० सालात सुरु होईल आणि येथे तयार होणारे रोबो चीन सह आशियाई देशात निर्यात केले जातील. अमेरिकेच्या नंतर चीन हा एबीबी चा दोन नंबरचा बाजार आहे.

स्विस कंपनीचे प्रमुख अलरीच स्पिशहॉपर म्हलाले शांघाय हे एबीबी व जगातील आधुनिक तंत्रज्ञानाचे सर्वात मोठे केंद्र बनले आहे. मजुरी महाग झाल्याने चीन रोबो निर्मितीवर अधिक भर देत असून २०१७ मध्ये जगात विकल्या गेलेल्या दर तीन रोबो मागे एक चीनी आहे. नव्या कारखान्यात माणसे आणि रोबो सुरक्षितपणे काम करू शकतील यासाठी खास सॉफ्टवेअर बनविले गेले आहे. रोबो बनविण्यासाठी अवश्य असलेले छोटे सुटे भाग असेम्बल करण्याचे काम येथे रोबोच करतील.

Leave a Comment