अंतराळात बाळाला जन्म देण्यासाठी करा अर्ज

birth
पृथ्वीबाहेर अंतराळात आपले बाळ जन्माला यावे अशी इच्छा असणाऱ्या आईवडिलांसाठी हि सुविधा स्पेसलाईफ ओरिजिन या कंपनीने सुरु केली असून त्यासाठी महिलांकडून अर्ज मागविले जात आहेत. अर्थ हा अर्ज करताना एक अट घातली गेली आहे. ज्या महिलांच्या दोन मुलांचे जन्म कोणताही अडथळा न येता सुलभ प्रसुतीने झाले आहेत अश्याच महिला यासाठी अर्ज करण्यास पात्र ठरणार आहेत.

कंपनीच्या म्हणण्यानुसार हि योजना २०२४ पर्यंत प्रत्यक्षात येणार असून त्यासाठी स्वयंसेवक हवे आहेत. या योजनेत २५ महिलांची निवड केली जाईल आणि पुढच्या ६ वर्षात दोन ते अडीच दिवसाचे मिशन राबविले जाईल. त्यासाठी जागतिक दर्जाच्या डॉक्टर्सची एक टीम काम करेल आणि या मिशन साठी ५० लाख डॉलर्स खर्च होईल.

कंपनीचे सीइओ कीज माल्डर म्हणाले पहिल्या टप्प्यात आम्ही एक इनक्युबेटर तयार केला आहे. यातून २०२१ मध्ये महिलेचे अंडे आणि पुरुष स्पर्म अंतराळात पाठवून तेथे त्यांच्या संयोग घडवून आणला जाईल. त्यातून जीव तयार झाला कि ४ दिवसानंतर इनक्युबेटर पृथ्वीवर आणून महिलेच्या गर्भाशयात गर्भ ठेवला जाईल आणि महिलेचा गर्भावस्था काळ आणि प्रसूती पृथ्वीवरच केली जाईल.

Leave a Comment