गुगल आणणार स्मार्ट गारमेंट्स

cloths
जगप्रसिद्ध सर्च इंजिन कंपनी गुगलची अनेक उत्पादने बाजारात दाखल झालेली आहेत. अगदी स्मार्ट स्पीकर, स्मार्टफोन पासून चालकविरहीत कार गुगल उत्पादनाच्या यादीत आहेत. आता त्यात नवी भर टाकली जात असून गुगल लवकरच स्मार्ट गारमेंट्स बाजारात आणत आहे. या इंटरअॅक्टीव्ह गारमेंटसाठीचे पेटंट गुगलने घेतले आहे.

levies
हे स्मार्ट कपडे युजरला रोजच्या जीवनातही फीडबॅक देतील असे सांगितले जात आहे. स्मार्टफोन प्रमाणे हे कपडेही युजरशी सतत जोडलेले असावेत अशी गुगलची मनीषा आहे. हे तंत्रज्ञान जॅकेत, शर्ट, पँटस अश्या रोजच्या वापरातल्या कपड्यांसाठी वापरले जाणार असून हे कपडे युजरची महत्वाची माहिती नोटीफाय करतील. शरीराच्या सेन्सिटिव्ह अवयवांशी संपर्क येथाच नोटीफीकेशन देतील. लेवाइसच्या मदतीने गुगलने यापूर्वी कॉम्पुटर ट्रकर जॅकेट सादर केले आहेच. या जॅकेट मधेच टच सेन्सिटिव्ह फिचर दिले गेले असून त्यामुळे युजर म्युझिक प्ले बॅक कंट्रोल आणि अन्य माहिती मिळवू शकतील.