टीयागो जेटीपी आणि टिगोर जेटीपी लाँच

tiago
टाटा मोटर्स आणि जयेश ऑटोमोटिव्ह यांच्या संयुक्त सहकार्यातून बनविल्या गेलेल्या टीयागो जेटीपी आणि टिगोर जेटीपी या दोन नव्या कार्स लाँच झाल्या असून त्याला ग्राहकांकडून आत्ताच चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले जात आहे. या दोन्ही गाड्या ऑटो एक्स्पो २०१८ मध्ये सादर केल्या गेल्या होत्या आणि तेव्हापासून ग्राहक या गाड्यांच्या प्रतीक्षेत होते.

टीयागो हि सर्वसामान्य ग्राहकांसाठी बनविलेली गाडी होती. नव्या रुपात या दोन्ही गाड्यांना १.२ लिटरचे टर्बोचार्ज्ड ३ सिलिंलडर पेट्रोल इंजिन दिले गेल्याने या गाड्या दमदार बनल्या आहेत. ० ते १०० किमीचा वेग हि गाडी १० सेकंदात घेते असा दावा केला जात आहे. या कार्सना ५ स्पीड मन्युअल गिअरबॉक्स दिला गेला असून स्पोर्टी लुक बम्पर मुळे त्या अधिक आकर्षक बनल्या आहेत.

हेडलँप, टेललँप, शार्कफिन अँटेना असे अनेक कॉस्मेटिक बदल केले गेले आहेत. कारची केबिन प्रशस्त असून टचस्रीर न युनिट दिले गेले आहे. टीयागोची सुरवातीची किंमत ६ लाख ३९ हजार, टिगोरची किंमत ७ लाख ४९ हजार आहे. या दोन्ही गाड्या सुरवातीला देशातील ११ शहरात विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

Leave a Comment