नवे सिमकार्ड घेण्यासाठी चुकूनही आधार क्रमांक देऊ नका

KYC
नवी दिल्ली : मोबाईल फोन ग्राहकांना किंवा नवे सिमकार्ड घेण्यासाठी आधार ई-केवायसी (e-KYC) लिंक करणे बंद करण्याचे आदेश सरकारने टेलिकॉम कंपन्यांना दिले आहेत. सरकारकडून शुक्रवारी हे निर्देश सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जारी करण्यात आले आहेत.

गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका महत्ताच्या निर्णयात खाजगी कंपन्यांना आधारचा वापर बंद करण्याचे आदेश दिले होते. दूरसंचार विभागाने न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत दूरसंचार कंपन्यांसाठी विस्तृत दिशानिर्देश जारी केले आहेत. यानुसार, विशिष्ट ओळख संख्येच्या (आधार) माध्यमातून ‘आपल्या ग्राहकांची ओळख’ (ई-केवायसी) चा वापर थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सोबतच कंपन्यांना या आदेशाच्या अनुपालनाचा अहवाल ५ नोव्हेंबरपर्यंत देण्यासही सांगण्यात आले आहे. दूरसंचार विभागाने दिलेल्या आदेशानुसार, नव्या कनेक्शनसाठी जर ग्राहकांनी स्वेच्छेने आधार दिले तर त्याचा वापर ओळखपत्राच्या रुपात केला जाऊ शकेल म्हणजेच त्याचा ऑफलाईन वापर करता येऊ शकेल. परंतु, आधारची सक्ती मात्र ग्राहकांना केली जाऊ शकत नाही.

Leave a Comment