पुढच्या वर्षी मलाईकाशी लगीनगाठ बांधणार अर्जुन कपूर?

arjun-kapoor
सोशल मीडियावर मलाईका अरोरा आणि अर्जुन कपूर या दोघांचाही मिलान एअरपोर्टवरचा फोटो व्हायरल झाला असून ही बातमी चर्चेत असतानाच लवकरच हे दोघे विवाहबंधनात अडकण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. या दोघांनीही रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली आत्तापर्यंत दिलेली नाही. पण या दोघांच्या विवाहाची घोषणा लवकरच होऊ शकते अशी शक्यता आहे. हे दोघे गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. पण मलाइकाने आम्ही चांगले मित्र असल्याचे म्हणत हा विषय कायमच टाळला आहे.

दरम्यान खात्रीलायक वृत्तानुसार पुढील वर्षी मलाईका अरोरा आणि अर्जुन कपूर हे दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत अशी माहिती समोर आली आहे. यासंदर्भातले वृत्त www.filmfare.com ने दिले असून नुकतेच हे दोघेही अबू जानी आणि संदीप खोसला यांच्या शोमध्ये गेले होते. तिथे त्यांचा एकमेकांबद्दलचा अंदाज, एकमेकांबद्दलची केमिस्ट्री खूप काही सांगून गेली. ते या शोमध्ये एकमेकांबद्दल बोलत नव्हते मात्र ते एकमेकांसोबत खूप आनंदी दिसत होते. आता आपले हेच नाते पुढे घेऊन जाण्यासाठी या दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता या दोघांच्या विवाहाची तारीख ठरली आणि त्यांचे शुभमंगल लागले तर आश्चर्य वाटायला नको.