जगातील सर्वाधिक उंचीचा रेल्वेमार्ग उभारणार इंडिअन रेल्वे

lehmanali
जगातील सर्वाधिक उंचीवरचा रेल्वे मार्ग उभारण्याचे काम इंडिअन रेल्वे हाती घेत असून हा मार्ग दिल्ली ते लेह असा आहे. या मार्ग भारत चीन सिमेजावळून जाणार आहे. त्यासाठी विलासपूर ते लेह मार्गाचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले असल्याचे समजते. या रेलवे मार्गाचा उपयोग भारतीय लष्कराला होणार आहेच पण त्यामुळे पर्यटनाला अधिक प्रोत्साहन मिळणार आहे.

सध्या जगातील सर्वात उंचीवरचा मार्ग चीनने तिबेट मध्ये बांधला असून त्याची उंची समुद्रसपाटीपासून २ हजार मीटर आहे. दिल्ली लेह मार्ग ५३६० मीटर उंचीवर बांधला जात असून हवामानाचा या मार्गावर कोणताही परिणाम होणार नाही असे समजते. ४६५ किमीच्या या मार्गावर ७४ बोगदे,१२४ मोठे पूल, ३९६ छोटे पूल असून सर्वात मोठा बोगदा २७ किमी लांबीचा असेल. या मार्गासाठी ८३३६० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

या मार्गावर ३० स्टेशन असतील आणि ३ हजार मीटर उंचीवरील बोगद्यात एक स्टेशन असेल. या रेल्वेचा अर्धा प्रवास बोगाद्यातूनच होणार आहे. या मार्गामुळे दिल्ली लेह प्रवास २० तासात होईल. सध्या या प्रवासाला ४० तास लागतात.

Leave a Comment