कर्मचार्यांना कार्स देणाऱ्या सावजीनी लेकाला घडविला वनवास

savaji
सुरत येथील हिरे व्यापारी सावजी ढोलकिया यांनी ६०० कामगारांना बोनस म्हणून कार्स आणि ९०० कामगारांना फिक्स डीपॉझीट दिल्याची बातमी वर्तमानपत्रातून गाजत आहे. मात्र कर्मचाऱ्यांना अशी माणुसकीची वर्तणूक देणारे ढोलकिया स्वतःच्या मुलाबाबत वेगळेच वर्तन करतात असे दिसून आले आहे. अर्थात यामागे मुलगा चांगला माणूस व्हावा आणि पैशाची खरी किंमत त्याला कळावी असाच त्यांचा उद्देश होता.

मिळालेल्या माहितीनुसार सावजींचा मुलगा द्रव्य २०१६ मध्ये न्यूयॉर्कमध्ये एमबीएचे शिक्षण घेत होता आणि जून मध्ये सुट्टीसाठी तो भारतात आला तेव्हा सावजीनी त्याला ७ हजार रुपये दिले आणि महिनाभर स्वतःच्या कष्टावर जगुन दाखव असे सांगितले. यातही त्यांनी काही अटी घातल्या होत्या. त्या म्हणजे नोकरी करायची, एका जागी १ आठवड्यापेक्षा जास्त नोकरी करायची नाही, स्वतःची ओळख द्यायची नाही, मोबाईल वापरायचा नाही आणि दिलेले ७ हजार रु. खर्चासाठी नाहीत तर आणीबाणी आली तरच वापरायचे आहेत.

dravya
द्रव्यने हे आव्हान स्वीकारले आणि त्याने थेट केरळमधील कोची गाठले. नोकरीसाठी तो ६० जागी फिरला पण नोकरी मिळाली नाही. नोकरी नाही त्यामुळे राहायला जागा नाही. त्याने स्वतःची ओळख गुजराथेतील गरीब परिवारातील आणि १२ पर्यंत शिकलेला अशी दिली होती. अखेर त्याला बेकरीत नोकरी मिळाली. पण एका जागी १ आठवड्यापेक्षा अधिक काल नोकरी न करण्याची अट असल्याने त्याने चापालाचे दुकान, मॅकडोनाल्ड, किराणा दुकान अश्या ठिकाणी नोकरया करून महिन्यात ३९०० रु. कमावले.

द्रव्य सांगतो, यातून मला तुम्ही उच्चशिक्षित असलात तरी तुमचे पाय जमिनीवर हवेत हे समजलेच पण पैशाचे महत्व समजले. सावजी सांगतात ३९०० रु. चा अजब योगायोग असा कि मी जेव्हा घरातून १८ व्या वर्षी काम करण्यासाठी सुरतला आलो तेव्हा माझ्या वडिलांनीही मला ३९०० रु.च दिले होते. मला पहिला पगार १७९ रु मिळाला त्यात १४० रु. खर्च झाला होता. हे वर्ष होते १९७७.

सावजीना जेव्हा असे विचारले गेले कि देशातील मोठमोठे उद्योजक त्याच्या मुलांना कंपनीत मोठ्या पोस्ट देत असताना तुम्ही मुलाला वनवास का घडवीला तेव्हा ते सांगतात या बड्या उद्योजकांच्या बरोबरीने माझा मुलगा यावा यासाठी हा प्रयत्न होता.