‘कुली नंबर वन’च्या रिमेकसाठी वरूण धवनची वर्णी!

varun-dhawan
बॉलिवूडमध्ये ‘स्टुडंट ऑफ द ईयर’ चित्रपटाद्वारे धमाकेदार एन्ट्री करणाऱ्या वरूण धवनने अल्पावधीतच सिनेसृष्टीत त्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आतापर्यंत अनेक सुपरडुपरहिट चित्रपट त्याने दिले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्याच्या ‘सुई-धागा’ या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर दमदार यश मिळवले. तो आता गोविंदाच्या एका ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या रिमेकमध्ये झळकणार आहे.

याआधीदेखील सलमान खानच्या ‘जुडवा’ चित्रपटाच्या रिमेकमध्ये वरूणने भूमिका साकारली होती. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपटही यशस्वी ठरला. विशेष म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन त्याचेच वडील डेव्हिड धवन यांनी केले होते. डेव्हिड धवन यांनी त्याच्या या चित्रपटाच्या यशानंतर आता गोविंदाच्या ‘कुली नंबर वन’ या चित्रपटाचा रिमेक बनवण्याचे ठरवले आहे. या चित्रपटातही वरूणचीच वर्णी लागली आहे.

याबाबत एका आघाडीच्या माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, कोणते कलाकार ‘कुली नंबर वन’ या चित्रपटात झळकणार हे अजून निश्चित करण्यात आले नाही. पण कलाकारांची नावे लवकरच जाहीर करण्यात येतील.