रोलेंड बोर्स्कीकडे आहे अॅपल उपकरणचा सर्वात मोठा संग्रह

appleco
जगभरात अॅपलची उत्पादने प्रचंड लोकप्रिय असून सर्वसामान्य माणसाला सुद्धा एखादा तरी आयफोन आपल्याकडे असावा अशी मनीषा असते. विएन्ना येथे राहणारा ५३ वर्षीय रोलंड बोर्स्की या बाबीत सर्वांच्या पुढे असून त्याच्याकडे जगातील सर्वात मोठा खासगी अॅपल उपकरणांचा संग्रह आहे असा त्याचा दावा आहे.

रोलंडकडे अॅपलने जेव्हा उत्पादनाची सुरवात केली त्या १९८१ पासून म्हणजे अॅपल १, मॅकेंटॉश पासून ते आजपर्यंत आलेले सर्व कॉम्पुटर आणि डिव्हायसेस आहेत. अशी ११०० उपकरणे त्याच्या संग्रही असून तो मुळी संगणक दुरुस्तीचा व्यावसायिकच आहे. रोलंड म्हणतो, फेब्रुवारी मध्ये विएन्ना येथे अॅपलने त्यांचे सर्व्हिस केंद्र सुरु केले आहे आणि त्यामुळे मी माझा व्यवसाय बंद करण्याच्या विचारात आहे. माझ्याकडच्या या संग्रहाचे प्रदर्शन मांडले जावे अशी माझी इच्छा आहे. यामुळे नवीन पिढीला प्रोत्साहन मिळेल.

रोलंड म्हणतो इतका मोठा संग्रह सांभाळण्यासाठी माझ्याकडे पुरेशी जागा नाही त्यामुळे हे कलेक्शन कुणी २५ ते ३० हजार डॉलर्स दिले तर तो विकायला तयार आहे.

Leave a Comment